पुणे : ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यातील एस.पी.कॉलेज येथे आज दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. त्या प्रकाशन सोहळयास मूलनिवासी मुस्लिम मंचासह अन्य संघटनांनी विरोध दर्शवला आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील, भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आधारित आणि स्मिता मिश्रा लिखित ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास खासदार निवृत्त डीजीपी डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते एस.पी. कॉलेजच्या रमाबाई सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमास पुण्याचे माजी पोलीस आयुक्त निवृत्त डीजीपी जयंत उमराणीकर आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवृत्त डीजीपी संजय बर्वे, पुस्तकाच्या लेखिका स्मिता मिश्रा आणि प्रकाशिका रेणू कौल वर्मा या उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: पुणे: लेफ्टनंट कर्नल पुरोहितांवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

भीम आर्मी बहुजन एकता मंचाचे अध्यक्ष दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी दोन दिवसांपूर्वी एस. पी. कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण एनआयए न्यायालयात प्रलंबित असून पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये करणे योग्य राहणार नाही. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली होती. तरी देखील तो कार्यक्रम होत असल्याने,शहरातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा: रेडिरेकनर दरनिश्चितीच्या कार्यपद्धतीमध्ये महिनाभरात बदल; महसूल मंत्री विखे पाटील यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याबाबत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार म्हणाले की, ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम एस. पी. कॉलेजमध्ये होऊ नये.यासाठी आम्ही तेथील प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली होती. पण आज कार्यक्रम होत आहे.आता आम्ही १० ते १५ संघटना एकत्रित येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.