पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यास आम्ही इच्छुक असल्याचे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याच्या जागेवर शनिवारी दावा केला. पुण्यात राष्ट्रवादीची जास्त ताकद असल्याने ही जागा आम्हाला मिळावी, असेही पवारांनी या वेळी सांगितले. पवार यांच्या या वक्तव्याने शहर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर विरोधी पक्षनेते पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. त्यामुळे पुण्यासाठी पोटनिवडणूक लागणार नाही, असे वाटले होते. मात्र, पोटनिवडणूक लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात आमची ताकद जास्त असल्याने आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीची ताकद इतर घटक पक्षांच्या तुलनेत जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे दहा नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. ज्या ठिकाणची निवडणूक लागेल त्या ठिकाणी आमच्या घटक पक्षांपैकी कोणाची ताकद जास्त असेल, त्यांना ती जागा मिळावी, असे माझे स्वत:चे मत आहे. मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांची माहिती घेतल्यास कोणाची किती ताकद याचा अंदाज येतो.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp claim for pune lok sabha seat ajit pawar statement upset the congress ysh
First published on: 28-05-2023 at 00:03 IST