पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) संचालक पदांच्या निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बँकेवरील वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, भाजपाचे दोन संचालक विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निर्भेळ यश मिळवता आले नाही.

बँकेच्या १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, संजय काळे, माऊली दाभाडे, रेवणनाथ दारवटकर, प्रवीण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, अप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित सात जागांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने १७ जागा घेत बँकेवरील पकड कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव केला. घुले यांच्याबरोबरच प्रकाश म्हस्के आणि आत्माराम कलाटे या ज्येष्ठ नेत्यांचाही पराभव पत्करावा लागला आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
RSS claims of support to Congress in Lok Sabha elections
‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

“मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं…”, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत वर्चस्व, मात्र ‘या’ एका जागेवरील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी

बँका, पतसंस्था या ‘क’ मतदार संघामध्ये कंद यांना ४०५ मते, तर घुले यांना ३९१ मते मिळाली. मुळशी तालुका मतदार संघात विद्यमान संचालक आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील चांदेरे यांच्यात चुरस होती. चांदेरे यांनी कलाटे यांचा नऊ मतांनी पराभव केला. चांदेरे यांना २७, तर कलाटे यांना १८ मते मिळाली. हवेली तालुका मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विकास दांगट यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीत दांगट यांनी म्हस्के यांचा १५ मतांनी पराभव केला.

शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा एकतर्फी विजय झाला. पवार यांना १०९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आबासाहेब चव्हाण यांना अवघी २१ मते मिळाली. ‘ड’ वर्ग मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर दुर्गाडे यांना ९४८, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दादासाहेब फराटे यांना २६५ मते मिळाली. दोन महिला प्रतिनिधी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा बुट्टे पाटील यांना २७४९ मते, तर निर्मला जागडे यांना २४८८ मते घेत विजय साकारला.

राष्ट्रवादी काँग्रेस –

उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), गृहमंत्री दिलीप वळसे (आंबेगाव), सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (पणन प्रक्रिया संस्था ‘ब’ गट), आमदार दिलीप मोहिते (खेड), आमदार अशोक पवार (शिरुर), रमेश थोरात (दौंड), संजय काळे (जुन्नर), माऊली दाभाडे (मावळ), रेवननाथ दारवटकर (वेल्हा), प्रवीण शिंदे (अनुसूचित जाती जमाती), संभाजी होळकर (इतर मागास वर्ग), दत्तात्रय येळे (भटक्या विमुक्त जाती जमाती), विकास दांगट (हवेली), सुनील चांदेरे (मुळशी), दिगंबर दुर्गाडे (‘ड’ गट), निर्मला जागडे (महिला प्रतिनिधी) आणि पूजा बुट्टे (महिला प्रतिनिधी)
भाजप – आप्पासाहेब जगदाळे (इंदापूर) आणि प्रदीप कंद (बँका पतसंस्था ‘क’ गट)

काँग्रेस –

आमदार संग्राम थोपटे, (भोर) आणि संजय जगताप (पुरंदर)