अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३ किलो ४५० ग्रम चरस आणि चार चाकी गाड़ी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुण्यातील नगररोड येथील फिनिक्स मॉल समोर या परिसरात ५ जण चरस घेऊन येणार आहेत अशी माहिती मिळाली. गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी समाधान दत्तु गोरे, आसाराम वैजनाथ रामा सांगळे, भास्कर दत्तू गोपाळघरे, फिरोज इकबाल पंजाबी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2017 रोजी प्रकाशित
पुण्यात पोलिसांकडून साडेतीन किलो चरस जप्त, ५ जण अटक
पोलिसांनी १३ लाख ८० हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला

First published on: 24-03-2017 at 21:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndps act police arrest five people pune police