पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २४८ करोना रुग्ण आढळले. पुण्यात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ६४ हजार ५८९ एवढी झाली आहे. आज दिवसभरात आठ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात आतापर्यंत करोनामुळे चार हजार ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३२६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्यात आतापर्यंत एक लाख ५५ हजार ९१८ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New 248 corona positive patient found in pune svk88 dmp
First published on: 14-11-2020 at 18:23 IST