पुणे केंद्रातून निखिल बेलोटे महाअंतिम फेरीत

स्पर्धेची अंतिम फेरी स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आली होती.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्त्व स्पर्धे’च्या पुणे केंद्रावरील अंतिम फेरीत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या निखिल बेलोटे याने प्रथम क्रमांक पटकावला. निखिलला परीक्षक मंगला गोडबोले आणि डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पुणे : विषयाची सर्वसमावेशक आणि मुद्देसूद मांडणी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या निखिल बेलोटे याने ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्त्व स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील अंतिम फेरीत बाजी मारली.

रविवार, १७ मार्चला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत निखिल बेलोटे पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी आणि ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी परीक्षण केले. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’च्या वितरण विभागाचे सरव्यवस्थापक मिलिंद प्रभुघाटे, स्पेस मार्केटिंगचे व्हाइस प्रेसिडेंट केव्हिन सँटोस आदी या वेळी उपस्थित होते. विभागीय अंतिम फेरीसाठी – लक्ष्यभेदी नवा पर्याय?, गल्लीबॉयचे भवितव्य, खेळातील परके शेजारी, पुढारलेल्यांचे आरक्षण हे विषय देण्यात आले होते. अंतिम फेरीत दहा स्पर्धकांनी सादरीकरण केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nikhil belote from the pune in the final round of vaktrutva spardha

ताज्या बातम्या