लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : निर्भय बनो सभेसाठी पुण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. तसेच गाडीवर शाईफेक करण्यात आली.

निर्भय बनो या सभेचे राष्ट्रसेवा दल येथे आयोजन करण्यात आले आहे. निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांनी पुण्यात येण्यास विरोध केला होता. तसेच या सभेस परवानगी न देण्याची मागणीही करण्यात आली होती.

आणखी वाचा- पुणे: अजित पवारांनी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यावर केली टीका; म्हणाले, “त्याच्या बापाने बघितलं होतं का…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांना विरोध करण्यासाठी सभा स्थळाच्या बाहेर सायंकाळपासून भाजप कार्यकर्ते जमा झाले, तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर निखिल वागळे यांची गाडी त्या ठिकाणी येताच गाडीची पुढची काच फोडण्यात आली, गाडीवर शाईफेक करण्यात आली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.