पुणे : बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी), सर परशुरामभाऊ महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालयासह एकूण नऊ महाविद्यालयांनी फिरोदिया करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेची अंतिम फेरी २५ आणि २६ फेब्रुवारीला रंगणार आहे. 

सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमी यांच्यातर्फे आयोजित फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेची प्राथमिक फेरी बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात झाली. दिग्दर्शक आदित्य इंगळे, गिरीश दातार, अनमोल भावे, प्राजक्ता अत्रे, देवेंद्र गायकवाड यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. प्राथमिक फेरीनंतर रात्री निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे आयोजक अजिंक्य कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

 फिरोदिया करंडक स्पर्धेचे यंदा ४९वे वर्ष आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पन्नासहून अधिक महाविद्यालयांनी सादरीकरण केले. प्राथमिक फेरीत झालेल्या सादरीकरणांतून डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (सांबरी), पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (मोहपाडा),  बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (तुम बहते रहना), सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (रिवाज), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी (बंबई मेरी जान), जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय (उपज), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (उबरमेन्च), राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय ( फिर मिलेंगे) आणि फर्ग्युसन महाविद्यालय (वगसम्राज्ञी) यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.