लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजाविली जाणार आहे.

chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
Pimpri, Ex-boyfriend,
पिंपरी : प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; बॉयफ्रेंड गंभीर जखमी
maharashtra ssc 10th result declared
१८७ जणांना पैकीच्या पैकी! १०वीचा निकाल जाहीर; १४ लाख ८४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
minors Both blood samples revealed no alcohol
अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या दोन्ही नमुन्यांत मद्यांश नसल्याचे उघड, रक्ताचे नमुने घेण्यास विलंब?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात शिवाजीनगर न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती.

आणखी वाचा-पुणे : रक्ताचे नमुने देणारा कोण? पोलिसांकडून तपास सुरू

विश्रामबाग पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०४नुसार कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, असे सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.