पाणीपट्टी थकविणाऱ्यांमध्ये शासकीय कार्यालयांची संख्या सर्वाधिक

पुणे : पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिके ने हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, पोलीस आयुक्तालय, बँकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एक लाखाहून जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी महापालिके ने जाहीर के ली असून २५ जूनपर्यंत थकबाकी न भरल्यास नळजोड बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

निवासी आणि व्यावसायिक वापराच्या मिळकतींकडून महापालिका पाणीपट्टी आकारते. पाणीपट्टीची ५५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये व्यावसायिक वापराच्या मिळकती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मिळकतींक डे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. खडकी आणि पुणे कॅ न्टोन्मेंट बोर्डाकडेही पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात व्यावसायिक मिळकतींकडील थकबाकी वसूल करण्यास सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांची यादी पाणीपुरवठा विभागनिहाय महापालिके ने संके तस्थळावर प्रसिद्ध के ली आहे.

या यादीमध्ये बांधकाम व्यावासयिक, हॉटेल्स, रिसार्ट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कं पन्यांची कार्यालये यांचा समावेश आहे. मात्र सर्वाधिक मोठी थकबाकी ही शासकीय कार्यालयांकडे आहे. पोलीस आयुक्त कार्यालय, राज्य राखीव पोलीस दल, ग्रामीण पोलीस, टेलिफोन कार्यालय, पशुसंवर्धन आयुक्तालय, साखर आयुक्तालय, रेल्वेची कार्यालये, बालभारती यांच्यासह शैक्षणिक संस्थांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांना महापालिके कडून नोटीस बजाविण्यात आली आहे.

शहरात ३५ हजार व्यावसायिक मिळकतींना जलमापकाद्वारे पाणीपुरवठा के ला जातो. त्यांच्याकडे १७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दुबार देयके , चुकीच्या देयकांचाही यामध्ये समावेश असून काही जणांनी न्यायालयात दावे दाखल के ले आहेत. तसेच लोकअदालतीमध्ये तडजोड के ल्यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

थकबाकीदारांची संख्या

१० लाख ते १ कोटीची थकबाकी असलेल्यांची संख्या २५४ एवढी असून त्यांच्याकडे ५८ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर एक कोटीपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची संख्या ८० असून त्यांच्याकडे ८० कोटींची थकबाकी आहे. तीन लाख ते पाच लाखाची थकबाकी असलेल्यांची संख्या १ हजार ३३६ अशी असून त्यांच्याकडून  ५२ कोटी १५ लाख रुपये येणे अपेक्षित आहे. तसेच पाच लाख ते १० लाखांपर्यंत थकीत रक्कम असलेल्या १ हजार २७ मिळकती असून त्यांच्याकडे ६० कोटींची थकबाकी असल्याची माहिती महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.