पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून डॉ. अजित रानडे यांना हटवावे, ही मागणी गेल्या काही काळापासून होत होती. मात्र, ‘हे आरोप निराधार असून, मी ते फेटाळतो. माझी नियुक्ती नियमानुसार अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली,’ अशी भूमिका डॉ. रानडे यांनी वेळोवेळी मांडली होती. त्याचप्रमाणे या आरोपांबाबत शिक्षणतज्ज्ञ आणि गोखले संस्थेची पालक संस्था असलेल्या भारत सेवक समाजाच्या सचिवांनीही आपापल्या भूमिका मांडल्या होत्या.

डॉ. अजित रानडे यांना ‘यूजीसी’च्या कुलगुरू पदासाठीच्या एका नियमाप्रमाणे सलग दहा वर्षे अध्यापनाचा अनुभव नाही, असा मुद्दा त्यांच्या निवडीवर आक्षेप घेताना उपस्थित केला गेला होता. त्यावर, दहा वर्षे अध्यापनाच्या अटीचा आता फेरविचार करण्याची गरज असून, प्राध्यापकांनाच कुलगुरू करण्याचा हट्ट असू नये, असे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले होते. ‘कुलगुरू पदाच्या जबाबदाऱ्या आता बदलल्या आहेत. कुलगुरूंकडे शैक्षणिक जबाबदाऱ्यांच्या पलीकडे नेतृत्व, भविष्याचा दृष्टिकोन, निधी उभारणी अशा अनेक जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा संरक्षण क्षेत्रातील अनुभवी लोकही कुलगुरू पदासाठी मिळू शकतात. प्राध्यापक निवडीमध्ये दहा वर्षे अध्यापनासह संशोधनाचा अनुभव ग्राह्य धरला जातो. तशीच मुभा कुलगुरू निवडीतही दिली पाहिजे. असा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आणि यूजीसीच्या ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ योजनेला अनुरूप आहे,’ असे मत ‘यूजीसी’चे माजी उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी रानडे यांच्यावरील आक्षेपाबाबत व्यक्त केले होते.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…

हेही वाचा : गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द

गोखले संस्थेची पालक संस्था असलेल्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी अर्थात भारत सेवक समाजानेही आधी डॉ. अजित रानडे यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. रानडे संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर असूनही त्यांनी कुलगुरू शोध समितीच्या सदस्यपदी महेंद्र देव यांची निवड केल्याचा आणि याच समितीने रानडे यांची मुलाखत घेतल्याने यात हितसंबंध असल्याचा हा आक्षेप होता. मात्र, नंतर तो मागे घेत असल्याचे भारत सेवक समाजाच्या सचिवांनीच अधिकृतपणे सांगितले होते. ‘डॉ. अजित रानडे यांची निवड कायदेशीररीत्या योग्य आहे. डॉ. राजीव कुमार यांनी निवड करताना सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. रानडे यांची नियुक्ती नियमानुसार आणि कायदेशीर आहे. काही असंतुष्ट लोकांचा आक्षेप असेल, तर कायदेशीर मार्गाचा वापर करावा, समाजात गैरसमज पसरवू नयेत,’ असे स्पष्टीकरण भारत सेवक समाजाचे सचिव मिलिंद देशमुख यांनी दिले होते.