पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांना भीषण आग; आगीत वाहन जळून खाक

मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र वापरून आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांना दिली. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुधीर कुरुमकर यांनी फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.