scorecardresearch

अ‍ॅमेझॉनकडून कार्यालयासाठी पुण्यातील खराडी येथे जागा भाड्याने

अ‍ॅमेझॉनने पुण्यात डेटा सेंटर सुरू करण्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. त्यानुसार खराडी येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील प्रकल्पात खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून २ लाख चौरस फूट जागा घेतली होती.

Office space rent amazon pune
पुण्यातील कार्यालयाची जागा अ‍ॅमेझॉनकडून भाड्याने (संग्रहित छायाचित्र)

पुणे : अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या फटक्यामुळे ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यानंतर आता अ‍ॅमेझॉन डेव्हलपमेंट सेंटरने पुण्यात मोठी जागा भाड्याने घेतल्याचे समोर आले आहे.

अ‍ॅमेझॉनने पुण्यात डेटा सेंटर सुरू करण्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. अ‍ॅमेझॉनसारखी जागतिक स्तरावरील मोठी कंपनी पुण्यात कार्यालय सुरू करणार असल्याने रोजगार निर्मिती होणार असल्याने उद्योग क्षेत्रात उत्साह निर्माण झाला होता. त्यानुसार खराडी येथील माहिती तंत्रज्ञान स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये प्रकल्पात खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून सुमारे २ लाख चौरस फूट जागा घेतल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश, आदेशाचा भंग केल्यास कारवाई

हेही वाचा – पुणे : कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले निरीक्षणगृहातून पसार, येरवड्यातील घटना

गेल्या काही महिन्यांत बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीचा मोठा फटका अ‍ॅमेझॉनला बसला आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता पुण्यातील कार्यालयाची जागा भाड्याने घेण्यात आल्याचे समजते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:01 IST