अंगारक चतुर्थीनिमित्त मध्यभागातील शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (१० जानेवारी) बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्यावरुन जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेतृत्व कोण? राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्याचं घेतलं नाव, म्हणाले…

अंगारक चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांची गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता मंगळवारी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

हेही वाचा- तळेगावजवळी कान्हे परिसरात बिबट्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह चौकमार्गे डेक्कन जिमखान्याकडे जावे. फर्ग्युसन रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ जाऊन इच्छितस्थळी जावे.