फग्र्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरचे नूतनीकरण पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.
फग्र्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरच्या शताब्दी वर्षांचे औचित्य साधून अॅम्फी थिएटरचे नूतनीकरण करण्यात आले. थिएटरच्या मूळ वास्तूचे सौंदर्य अबाधित राखून त्याची डागडुजी करण्यात आली आहे. व्यासपीठाचे नूतनीकरण, रंगरंगोटी, नवी आसनव्यवस्था, ध्वनी आणि प्रकाशाची अद्ययावत सुविधा, सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. नव्या व्यासपीठाला बी. जी. शिर्के यांचे नाव देण्यात आले आहे. या थिएटरचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता हा सोहळा होणार आहे. यावेळी ‘शिक्षण आणि विकास’ या विषयावर मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.