पुणे : नवसाला पावणारा गणपती, पुण्यातील मानाच्या गणपतींच्या बरोबरीने स्थान असणारा आणि ज्याची कीर्ती संपूर्ण जगभरात पोहोचली आहे अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीचा इतिहास तितकाच रंजक आहे. सध्या गणपती मंदिरात आणि दहा दिवसांच्या गणेेशोत्सवामध्ये भाविक ज्या मूर्तीचे दर्शन घेतात ती हुबेहूब मूर्ती १९६८ मध्ये घडविण्यात आली असून गणरायाची मूळ मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंडळाकडे आहे. हे मंडळ याच मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. बुधवार पेठेतील दत्त मंदिर हे त्यांचे वास्तव्याचे स्थान होते. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ते स्वतः व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले. त्यावेळी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज यांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करा, असे सांगितले. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील, असे त्यांनी हलवाई दाम्पत्याला सांगितले होते.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

हेही वाचा : पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन मिळकतींचा शोध घेण्याची सुविधा पूर्ववत

दगडूशेठ हलवाई यांनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती आणि गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, सरदार परांजपे असे नामवंत उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर होईपर्यंत गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवली जात होती.

हेही वाचा : दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ हजार महिलांकडून अथर्वशीर्ष पठण; पाहा Video

लोकमान्य टिळक यांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. १८९६ मध्ये घडविण्यात आलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दुसऱ्या मूर्तीचा उत्सव होऊ लागला. दगडूशेठ हलवाई यांची गणेशोत्सवाची परंपरा परिसरातील नागरिक आणि तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठ गणपतीची जबाबदारी घेतली. १८९६ मध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. मग नवीन मूर्ती घडविण्याचा संकल्प १९६७ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृतमहोत्सवी वर्षांत करण्यात आला होता, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा : विदर्भात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ

सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १९६८ मध्ये कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. ही मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तींचे काम करण्यात आले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. गणेश यंत्राची पूजा केली. ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती तेथे विधिवत गणेश याग केला. त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च हा केवळ १ हजार १२५ रुपये आला होता. या मूर्तीच्या सुबकतेला आणि तिच्यातील देवत्वाला मोठ्या प्रमाणात मानले जाते. गणरायाची आणखी एक मूर्ती कोंढवा येथील पिताश्री वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यात आली आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.