सर्व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी थेट नदीत मिसळले जात असल्याने नदीतील पाणी प्रदूषित झाले असून नदीलगतच्या परिसरात पहाटे आणि सायंकाळी तीव्र दरुगधी पसरली असल्याचे राजीव गांधी प्रतिष्ठानने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी दिलेल्या निवेदनात अस्वच्छ पवना नदीला जबाबदार कोण आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पवनेच्या पात्रात अतोनात घाण होत आहे. गावोगावी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीनंतरची राख नदीकाठी टाकली जाते. पाणी नसल्याने ती वाहून जात नाही. त्यामुळे चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, िपपळे सौदागर, िपपळे गुरव, सांगवी या भागातील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. आता बंधारे फोडण्यात येत आहे. मात्र, पालिकेने कोल्हापूरच्या धर्तीवर नदीवर बंधारे बांधण्याची तसेच पाणी अडवण्याची गरज आहे. आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालून पवना नदी प्रदूषणमुक्त करावी, असे नवले यांनी या निवेदनात म्हटले आहे.