हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास चिंचवडमध्ये घडली असून अज्ञात आरोपीचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत. दरम्यान, हत्येच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. घटनेतील अज्ञात आरोपीने अमीर मकबूल खान यांच्या हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकल्याचे स्पष्ट दिसत आहे. जखमी अमीर हा काही क्षणात जमिनीवर कोसळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास आमिर मकबूल खान या रिक्षाचालक तरुणाची अज्ञात व्यक्तीने हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या केली. अमीर आणि संशयित आरोपी यांच्यात काही वेळ झटापट झाली. त्यांचे हे भांडण पाहून त्रयस्थ व्यक्तीने त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघेही एकमेकाला धक्काबुक्की करत होते. यातील आरोपी याने खिशातील स्क्रू ड्रायव्हर काढला आणि थेट अमिर मकबूल खान यांच्या हृदयात घुसवला. त्यानंतर काही क्षण तो आरोपीचा प्रतिकार करत होता. पुढील अवघ्या काही क्षणात तो जमिनीवर कोसळला. गंभीर जखमी होऊन आणि थेट हृदयात वार केल्याने अमिर मकबूल खान यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप हत्येचे कारण समजू शकलेलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा – पुणे : नगर रस्त्यावर डंपरची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू
हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास चिंचवडमध्ये घडली असून अज्ञात आरोपीचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत. दरम्यान, हत्येच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. pic.twitter.com/arg2De8iHC
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) October 7, 2024
कासारवाडीत वाहनांची तोडफोड…
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातीलच कासारवाडीत आठ ते दहा वाहनांची अज्ञात व्यक्तींना तोडफोड केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सांगवी, चिंचवड, निगडी या ठिकाणी २८ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. काही तासांमध्ये आरोपींना जेरबंदही करण्यात आलं होतं. पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून तोडफोडीचे सत्र सुरूच आहे.