scorecardresearch

Premium

पुणे : तरुणींची छेड काढणारा ‘बकासूर’ अटकेत; कोयता जप्त

गोखलेनगर भागात तरुणींची छेड काढणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला.

Person provoke women arrested pune
पुणे : तरुणींची छेड काढणारा ‘बकासूर’ अटकेत; कोयता जप्त (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : गोखलेनगर भागात तरुणींची छेड काढणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. आदित्य उर्फ बकासूर अविनाश मोरजकर (वय १९, रा. होमी भाभा हाॅस्पिटलजवळ, वडारवाडी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मोरजकरविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता. मोरजकरने जनवाडी, गोखलेनगर परिसरात तरुणींची छेड काढण्याचे गुन्हे केले होते. मोरजकर पसार झाला होता. तो जनवाडीतील जनसेवा चौकात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे, मॅगी जाधव, प्रदीप राठोड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला.

delivery boy was robbed pune
पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
ravindra-dhangekar-12
आंदोलन करणाऱ्या मविआच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की; आमदार धंगेकर म्हणाले, “पुणे पोलिसांची…”
mumbai high court marathi news, house owner mumbai marathi news, landlord mumbai marathi news
भाडेकरुंच्या गुन्ह्याची शिक्षा घरमालकाला देता येणार नाही, घरमालकाला दोषमुक्त करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले

हेही वाचा – पिंपरी : शॉर्टकट भलताच महागात पडला, दलदलीत फसलेल्या व्यक्तीची अग्निशमन विभागाने केली सुटका

हेही वाचा – पुण्यातील गतिरोधक जीवघेणे

सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दराेडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, उपनिरीक्षक शाहीद शेख, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, प्रदीप राठोड, गणेश ढगे, आजीनाथ येडे आदींनी ही कारवाई केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Person who provoke young women arrested pune print news rbk 25 ssb

First published on: 21-07-2023 at 13:25 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×