२१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत पुणे शहरातील पेट्रोल पंप सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील तर पुणे शहराबाहेर असेलेले पेट्रोल पंप सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील अशी माहिती पेट्रोल डिलर असोसिएशनच्या कार्यकारणीने दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर अनेकदा गर्दी होते. ती गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे विशद केले. कोणीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. खबरदारीची सुरुवात स्वतःपासून करा असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच ३१ मार्च पर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या काळात खबरदारी घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.