सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय, इंधन चोरीच्या घटना देखील सुरूच आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड येथे चोरट्याने बुलेटमधून पेट्रोल चोरी केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील नटराज फोटो स्टुडिओ येथील गल्लीत बुलेट उभी करण्यात आली होती. आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने टेहळणी करत बुलेट मालकाच्या इमारतीकडे पाहात बाटलीत पेट्रोल काढून घेतले आणि तेथून पळ काढला आहे.

मात्र, या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून देहूरोड पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेल काही रुपयांनी स्वस्त झाले. तरीदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला दर परवडत नसल्याचं दिसत आहे. दोन आठवड्यापूर्वीच ट्रक मधून डिझेल चोरी केल्याचं समोर आलं होतं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol theft incident in pimpri captured on cctv msr 87 kjp
First published on: 18-11-2021 at 20:16 IST