एकनाथ शिंदें रिक्षा सोबत असं सांगणारा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून रिक्षावाल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे हे स्वतः रिक्षा चालक होते. त्यामुळं रिक्षावाल्यांना देखील त्यांचं कौतुक आहे. एकनाथ शिंदेंचा रिक्षा सोबतचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दाढी असलेला एक तरुण आणि त्याच्या शेजारी रिक्षा असा एक फोटो सोशल मीडियावर दिसत आहे. तो फोटो एकनाथ शिंदेंचा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून विविध प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. 

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण तो त्यांचा नसल्याचं पुढे आलं आहे. या व्हायरल फोटोची चर्चा राजकीय नेत्यांपर्यंत पोहचली आणि मग याची खात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः केली. तो फोटो एकनाथ शिंदेंचा नसून पिंपरी-चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा आहे. यासंबंधी आज अजित पवार यांनी बाबा कांबळे यांना फोन केला होता. तो फोटो शिंदेंचा आहे की तुझा अशी विचारणा देखील अजित पवारांनी यावेळी केली. १९९७ ला पिंपरी चौकात रातराणी रिक्षा स्टॅण्ड सुरू झालं. तेव्हा श्रावण महिना असल्याने रिक्षा सजवली आणि फोटो काढला अशी माहिती कांबळे यांनी दिली. शिंदेंचा फोटो आहे असं का सांगितलं जातंय असा प्रश्न अजित पवार यांनी बाबा कांबळेंना केला. त्यावर कांबळे यांनी सविस्तर माहिती अजित पवार यांना दिली.