गडचिरोली भागात गतवर्षी सात नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. योगेश गुजर असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळ पिंपरी-चिंचवड येथील होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी पिंपरी भाटनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. गतवर्षीच त्यांचा विवाह झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. योगेश गुजर यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख होती. सुरवातीला दोन वर्षे सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pi yogesh gujar died who had killed seven maoist
First published on: 09-03-2019 at 12:54 IST