दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि बालकलाकार सोमनाथ अवघडे यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता होण्याची संधी देणारा ‘फॅन्ड्री’, सवरेत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट ठरलेला ‘आजचा दिवस माझा’, प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरविलेला ‘नारबाची वाडी’, राष्ट्रीय पुरस्कारामध्ये विशेष मानकरी ठरलेला ‘यलो’, धाडसी विषयाच्या वैशिष्टय़पूर्ण हाताळणीने गाजलेला ‘रेगे’, ‘अवताराची गोष्ट’ आणि उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित करणारा ‘दुनियादारी’ असे सात चित्रपट रसिकांना शुक्रवारपासून (९ मे) मोफत पाहण्याची पर्वणी लाभणार आहे.
संवाद पुणे संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे विभाग यांच्या सहकार्याने यंदापासून ‘पुण्यहिरकणी कलागौरव’ पुरस्कार सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ९ ते १५ मे या कालावधीत ‘पुण्यहिरकणी चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. विजय चित्रपटगृह येथे दररोज सकाळी दहा वाजता हा महोत्सव होणार असून पुणेकर रसिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, दिग्दर्शक कांचन नायक, केदार असोसिएट्सचे संचालक सूर्यकांत निकम आणि दिलीप निकम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुनील महाजन आणि मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2014 रोजी प्रकाशित
उत्कृष्ठ मराठी चित्रपट पाहण्याची पुणेकर रसिकांना संधी
‘फॅन्ड्री’, ‘आजचा दिवस माझा’, ‘नारबाची वाडी’, ‘यलो’, ‘रेगे’, ‘अवताराची गोष्ट’ आणि ‘दुनियादारी’ असे सात चित्रपट रसिकांना शुक्रवारपासून (९ मे) मोफत पाहण्याची पर्वणी लाभणार आहे.
First published on: 07-05-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture marathi movie best