राज्यात एकीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना, ऑक्सिजन गळतीच्या घटना समोर येत आहेत.  पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आज (बुधवार) ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँक भरताना लिकेज होऊन मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन गळती झाल्याची घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायसीएम रूग्णलायाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका ऑक्सिजन टँकरचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने रूग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन गळती झाली होती. मात्र सुदैवाने प्रशासन व अग्निशामक दलाने वेळेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने, नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.

ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. तातडीने उपाययोजना करत गळती थांबविण्यात आली असून घटनास्थळी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राजेंद्र वाबळे यांनी धाव घेतली होती. नागरिकांनी घाबरून जाण्याच कारण नाही असं अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी म्हटलं आहे.

गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

 नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.  ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली होती.  रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad oxygen leak at ycm hospital msr 87 kjp
First published on: 09-06-2021 at 21:42 IST