सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. शहरातील पिंपळे गुरव परिसरात आज पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा टॉवेल-श्रीफळ देऊन सन्मानित केलं. तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचं मनोबल वाढवलं. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो’ असा जयघोषही यावेळी करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी रूट मार्च काढला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पिंपळे गुरव परिसरात काही करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील परिसर सील करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून आज रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि इतर कर्मचारी यात सहभागी झाले होते. पोलिसांनी साठफुटी रोड येथून रूट मार्चला सुरुवात केली. विविध गल्ल्यांमधून मार्ग काढत असताना प्रत्येक ठिकाणी नागरिक टाळ्या, शंखनाद करून पोलिसांना प्रोत्साहन देत होते. काही ठिकाणी तर पारंपारिक पद्धतीनं टॉवेल टोपी आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad salute to the work of the police honored by the citizens during the root march aau 85 kjp
First published on: 02-05-2020 at 17:12 IST