scorecardresearch

Premium

कौतुस्कास्पद! पिंपरी आयुक्तांनी साडेचार हजार पोलिसांना दिवाळीनिमित्त दिली ‘ही’ भेट

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दिवाळी गोड झालेली आहे.

Pimpri Commissioner Vinay Kumar Choubey has given 4500 to the police on the occasion of Diwali visit
कौतुस्कास्पद! पिंपरी आयुक्तांनी साडेचार हजार पोलिसांना दिवाळीनिमित्त दिली 'ही' भेट

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दिवाळी गोड झालेली आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी पोलीस अमलदार आणि अधिकाऱ्यांना पाच किलो साखरेचे वाटप केले आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांची दिवाळी गोड झाल्याचं बोललं जात आहे.

पोलीस म्हटलं की २४ तास ऑन ड्युटी राहावं लागतं. पोलिसांमुळेच सर्वसामान्य नागरिकांचे सण सुरक्षित रित्या पार पडतात. त्याच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना दिवाळी सारखे महत्त्वाचे सण साजरा करता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी खाकी वर्दी च पोलिसांची भावना समजू शकतो. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलिसांची पोलीस कल्याण निधीमधून पाच किलो साखरेच वाटप केले आहे. पोलीस आयुक्तांच कौतुक होताना दिसत आहे. याआधी असा उपक्रम राबविण्यात आलेला नव्हता. असाही उपक्रम राबवून पोलिसांच मनोबल वाढवू शकतो असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे असं म्हणावं लागेल.

32 representatives of cooperative societies from Kolhapur district were honored with flight to Delhi
कोल्हापुर जिल्ह्यातील ३२ सहकारी संस्था प्रतिनिधींना दिल्ली हवाई यात्रेचा मान
Bhoomipujan of various development works in Uran by Rural Development Minister Girish Mahajan
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते उरणमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन
Jalgaon people morcha
या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा
nashik city, police, pistols, cartridges
नाशिक : उपनगरात दोन गावठी बंदुका, तीन जिवंत काडतुसे जप्त, तिघांना अटक

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri commissioner vinay kumar choubey has given 4500 to the police on the occasion of diwali visit kjp 91 amy

First published on: 13-11-2023 at 19:43 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×