पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या एका ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या आजारानंतर महिलेला न्यूमोनियाची लागण झाली होती.ही महिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल झाली होती. महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची १३ रुग्ण होते. त्यापैकी सहा रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका ६४ वर्षीय महिलेला १७ नोव्हेंबर रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये  दाखल केले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर २४ नोव्हेंबरला डॉ. डी वाय पाटील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. या रुग्णाला न्यूमोनियाची लागण झाली आहे.

अतिदक्षता विभागात  उपचार सुरू होते. त्यानंतर २९ डिसेंबरला या महिलेला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. महिलेवर उपचारासाठी सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी (२१ जानेवारी) या महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू न्यूमोनिया या आजाराने झाला असल्याचे  वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.