पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नेहरूनगर आणि भोसरीतील नऊ वॉशिग सेंटरचे बेकायदा नळजोड तोडण्यात आले.

पवना धरणातील पाणीपातळी सातत्याने घटत असून ऊनाचा चटका वाढत असल्याने नागरिकांची पाण्याची गरज वाढत आहे. काही वॉशिंग सेंटरचालक पिण्याचे पाणी वापरतात, अशा तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरात २०७ वॉशिंग सेंटर असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये १६८ वॉशिंग सेंटर चालक बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वापरत असल्याचे आढळून आले आहे. तर, २९ सेंटर चालकांना पाच वर्षांपूर्वीच व्यावसायिक परवाना देण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी : पाण्याचा काटकसरीने वापर करा, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहरूनगरमध्ये तीन आणि भोसरीत सहा अशा नऊ वॉशिंग सेंटर चालकांकडून बेकायदा नळजोड घेण्यात आले होते. त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी सांगितले.