देशी बनावटीचे पिस्तूल विकण्याच्या तयारीत असलेल्या गजा मारणे टोळीतील सराईताला संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. सिंहगड रस्त्यावर शनिवारी (९ जानेवारी) ही कारवाई करण्यात आली.
दीपक सुभाष कडू (वय ३७, रा. आपटे कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. आरोपी कडू हा मारणे टोळीतील सराईत आहे. त्याच्याविरुद्ध खून, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. नीलेश घायवळ टोळीतील सराईत पप्पू तावरे याचा प्रवीण पासलकर, कडू आणि त्यांच्या साथीदारांनी दोन वर्षांपूर्वी पानशेतमधील जांभळी गावात खून केला होता. पासलकर याने कडू याला पिस्तूल ठेवण्यासाठी दिले होते. कडू याने खूनप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळवला आहे. तो शनिवारी सिंहगड रस्त्यावर पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार तानाजी कांबळे यांना मिळाली. सापळा रचून त्याला पकडले. कडू याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर.पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक पोपटराव गायकवाड, कर्मचारी तानाजी कांबळे, नाना जगताप, कांता बनसुडे, रमेश भिसे, सलीम पठाण, अब्दुल सय्यद, शीतल शिंदे, मयूर शिंदे यांनी ही कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onगुंडGangster
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pistols cartridge recovered gangster suspect gaja marane crime police
First published on: 11-01-2016 at 03:29 IST