पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा आणि पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठानच्या सहयोगाने व सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत यंदाचा ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार शांतनू मुखर्जी (शान) यांना जाहीर झाला आहे. सन्मान चिन्ह, एक लाख अकरा हजार रुपये रोख, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा २४ वे वर्ष आहे.

नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी याबाबतची माहिती दिली. उपाध्यक्ष किरण येवलेकर, प्रमुख कार्यवाहक सुहास जोशी, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सदस्य नरेंद्र आमले यावेळी उपस्थित होते. चिंचवड भोईरनगर येथील कामगार कल्याण मैदानात ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जेष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांची पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
zee natya gaurav puraskar 2024
मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”

हेही वाचा…पुणे : रेल्वेचा मेगा ब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशीरा धावणार…

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, गेल्या २४ वर्षांपासून जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावाने ‘आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. आजपर्यंत गानकोकिळा लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शान यांनी आजवर केलेल्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमेह निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य सादर केला जाणार आहे. शहरातील रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन भोईर यांनी केले आहे.