पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्रेक फेल झालेल्या पीएमपीएमएल बसने ५ ते ६ वहानांना धडक दिली. या विचित्र अपघातात १ जण ठार झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील अप्पर डेपो उतारावरून येत असताना बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या बसने टेम्पो आणि एका दुचाकीला जोरात धडक दिली. अन्य काही वाहनांनाही बसची धडक बसली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
