पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ, अवैध मद्य, रोकड जप्तीच्या कारवाईला वेग आला आहे. तसेच दोन्ही मतदार संघांच्या मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणच्या संवेदनशील मतदान केंद्रांचे चित्रीकरण केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवडमध्ये ४३ लाख रुपये, तर कसब्यात पाच लाख तीन हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये ७३३६.१६ लिटर, तर कसब्यात ३१३.१८० लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अनुक्रमे चार लाख ९७ हजार ६२५ आणि २० हजार ६५० रुपये आहे. चिंचवडमध्ये ९४ हजार ७५० रुपये किंमतीचे ३.५८४ ग्रॅम, तर पाच लाख रुपयांचे २५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> “ते गेले बिचारे, जाऊ द्या” भगतसिंह कोश्यारींच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचे हात जोडत मिश्किल वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, कसब्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सेंट्रल आर्मडड् पोलीस फोर्स – सीएपीएफ) पाच तुकड्या, पोलीस १५००, तर चिंचवडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स – सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स – सीआयएसएफ) आणि आयटीबीपीची प्रत्येकी एक तुकडी तैनात असेल. शीघ्र कृती दलाच्या (आरपीएफ) दोन तुकड्या, पोलीस ८३६, तर गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) १६९ कर्मचारी तैनात असणार आहेत. कसब्यात नऊ, तर चिंचवडमध्ये १३ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.

हेही वाचा >>> राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात २४ तासांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

कसब्यातील २७, तर चिंचवडमधील ५१ मतदान केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चिंचवडमध्ये १२ भरारी पथके, अवैध रोकड तपासणारी सात पथके, चित्रीकरण करणारी सहा, चित्रीकरण पाहणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे. कसब्यात भरारी आणि अवैध रोकड तपासणारी प्रत्येकी नऊ पथके, चित्रीकरण करणारी दोन, चित्रीकरण तपासणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action in kasba chinchwad constituency 43 lakhs in chinchwad psg 17 ysh
First published on: 21-02-2023 at 10:50 IST