पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मीस्टाईल अडवले. त्यापैकी काही जण गाडीतून उतरले तर काही जण डोंगराच्या दिशेने पळाले. दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली असून आत्तापर्यंत आठ दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, डोंगरामध्ये पळून गेलेल्या अज्ञातांचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार आणि दरोडेखोर हे मुंबईहून पुण्याचे दिशेने पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला, दरोडेखोर दोन गाड्यांमध्ये होते. ते उर्से टोल नाका येथे येताच त्यांना गाडीतून खाली उतरण्यास पोलिसांनी सांगितले. पैकी एका गाडीतील पाच जण खाली उतरले तर इतर दरोडेखोर पोलिसांना बघून पळण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता यात दरोडेखोरांच्या गाडीचा डॅश लागल्याने पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. 

bus, Nagpur-Tuljapur National Highway,
एसटी बस दरीत कोसळता कोसळता वाचली! नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

दरोडेखोर द्रुतगती मार्गावरून मुंबई च्या विरुद्ध दिशेने गाडी घेऊन काही अंतरावर गेले. काही अंतरावर गाडी थांबवून ते रस्त्यालगतच्या डोंगरांमध्ये पळून गेले गेले आहेत. त्या पैकी काही जणांना शोधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. दरम्यान, गुंडा विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा युनिट पाच हे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी डोंगराळ भागात आरोपींचा शोध घेत आहेत.