सर्व जण दिवाळीचा सण साजरा करीत असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ‘लेट्स राइट’, ‘लव पुणे’ व ‘ग्लोबल शेपर्स कम्युनिटी पुणे हब’ या संस्थांच्या वतीने ‘शेपर्स सॅल्युट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पोलिसांना दिवाळी भेटवस्तू देण्याबरोबरच ‘थँक यू’ लिहिलेले शुभेच्छा पत्रही देण्यात आले.
लक्ष्मी रस्ता, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, कोथरूड, बुधवार पेठ, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, संभाजी पोलीस चौकी, पौड फाटा पोलीस चौकी व हडपसर आदी भागांमध्ये तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या उपक्रमांतर्गत दिवाळीच्या भेटवस्तू देऊन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याची या संस्थांची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचा संकल्प या संस्थांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police diwali gift greeting thank you
First published on: 26-10-2014 at 03:25 IST