पिंपरी : केंद्र सरकार कामगार विरोधी आहे. कामगार हिताच्या कायद्याची मोडतोड केली जात आहे. कायदे मालकधार्जिणे केले जात आहेत. कामगार हा शब्दच कायमचा नष्ट होणार आहे. कामगारांचा संप करण्याचा अधिकारदेखील काढून घेण्यात आल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला. मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी (५ मे) कामगार मेळावा पार पडला. आमदार सचिन अहिर, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, सीआयटीयूचे पुणे जिल्हाध्यक्ष कॉ. अजित अभ्यंकर, अखिल भारतीय कामगार सेनेचे डॉ. रघुनाथ कुचिक, किरण मोघे, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकळे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मावळमध्ये उद्यापासून प्रचाराचा धडाका… कोणत्या नेत्यांच्या सभा होणार?

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government taken away right to strike from workers alleged labour leader pune print news ggy 03 zws
First published on: 05-05-2024 at 22:56 IST