‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून भेटण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरी येऊन बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार  मे या कालावधीत पीडित तरुणीच्या राहत्या घरी घडला आहे.

हेही वाचा >>> ललित पाटील प्रकरणात पोलीस दलातील दोन कर्मचारी बडतर्फ, ललितला पळून जाण्यास दोघांनी ‘अशी’ केली मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत २८ वर्षीय तरुणीने बुधवारी (३ जुलै) सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन संदिपान शिंगाटे (वय ३८, रा. चंद्रभागा आंगण, आंबेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची जानेवारीमध्ये जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने वेळोवेळी मुलीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.