तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवीस गुन्हे दाखल असलेली कुख्यात दलाल कल्याणी देशपांडे आणि तिच्या साथीदारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मोक्कासंदर्भातील प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. दोन महिन्यांपूर्वी बिबवेवाडी भागातील गुंड बापू नायर याच्या आईवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयश्री ऊर्फ कल्याणी उमेश देशपांडे (वय ४६, रा.बालाजी निवास, पाषाण-सूस रस्ता) आणि तिचा साथीदार रवी ऊर्फ प्रदीप रामहरी गवळी (वय २९, रा.कंदलगाव, ता.मोहोळ, सोलापूर) असे मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याणीने तिच्या साथीदारांमार्फत पुणे शहरात सन २००२ पासून वेश्याव्यवसायाचे जाळे तयार केले होते. तिने अनेक तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले होते. कोथरूड, डेक्कन, हिंजवडी, चतु:शंृगी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. सन २००५ मध्ये तिच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तिला सन २००८ आणि २०१४ मध्ये शहरातून तडीपार करण्यात आले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police invoke mcoca against notorious sex racketeer kalyani deshpande arrest under mococa
First published on: 23-10-2016 at 03:54 IST