लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वानवडी भागात मद्यधुंद तरुणीने सोसायटीच्या आवारात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याची माहिती मिळाली असून, अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

आणखी वाचा-खबरदार! तुमचे पाळीव जनावर लोहमार्गानजीक गेल्यास.. रेल्वेची विशेष मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नववर्षाच्या मध्यरात्री वानवडीतील एका सोसायटीत मद्यधुंद तरुणी आली. तिने सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षकाच्या केबीनजवळ ठेवलेले टेबल तिने फेकून दिले. तरुणीचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले. मद्यधुंद अवस्थेतील तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. या घटनेचे चित्रीकरण सोसायटीतील कॅमेऱ्यांनी केले आहे. गोंधळ घालणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे.