पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गातील शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. शारीरिक चाचणी १५ ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम विचारात घेऊन त्या त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र भारतीय निवडणूक आयोगाकडे आलेली निवेदने विचारात घेता १९, २६ आणि २७ एप्रिल रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी २९, ३० एप्रिल आणि २ मे रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचे सुधारित सविस्तर वेळापत्रक एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Postponement of physical test of psi by mpsc pune print news ccp 14 amy
First published on: 03-04-2024 at 05:20 IST