बायोस्पेक्ट्रम कंपनीतर्फे प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांना ‘बायोस्पेक्ट्रम लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तंत्रविषयक अभिनव प्रयोगांच्या माध्यमातून जैवइंधन उद्योगाला भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शाखांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांना दर वर्षी बायोस्पेक्ट्रम पुरस्काराने गौरविण्यात येते. चौधरी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ व्यवसाय आणि उद्योजकता क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये, संस्थात्मक पातळीवर आणि उद्योगांमध्ये काम करताना पुनर्नवीकरण होणाऱ्या ऊर्जेचा पुरस्कार केला आहे. तसेच वातावरणातील बदलावर चर्चा करणाऱ्या यूएन लीडरशिप फोरममध्ये भारताची भूमिका मांडली होती. सध्या ते जैवऊर्जा या विषयावरील ‘नॅशनल कमिटी कमिटी ऑफ द कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या अध्यक्षस्थानी आहेत. त्याशिवाय वर्ल्ड काउन्सिल ऑन इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी (डब्ल्यूसीआयबी) आणि एक्झिक्युटीव्ह काउन्सिल ऑफ असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एन्टरप्रायजेस (एबीएल) या संस्थाचे सदस्यही आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2014 रोजी प्रकाशित
‘प्राज’च्या प्रमोद चौधरी यांना ‘बायोस्पेक्ट्रम लीडरशिप’ पुरस्कार
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शाखांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांना दर वर्षी बायोस्पेक्ट्रम पुरस्काराने गौरविण्यात येते. चौधरी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ व्यवसाय आणि उद्योजकता क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

First published on: 01-01-2014 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praj industry pramod choudhary biospectrum