पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. सर्वसाधारण वर्गातून प्रसाद चौघुले प्रथम, उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आणि अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटीलने महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. यंदाच्या निकालावर अभियंत्यांचेच वर्चस्व राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीएससीतर्फे १३ ते १५ जुलै, २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ४२० विद्यार्थी पात्र झाले आहेत. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा १७ फेब्रुबारी रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरीता तीन लाख ६० हजार ९९० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेमधून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरीता सहा हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी एक हजार ३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad chougule top mpsc exam in maharashtra state zws
First published on: 20-06-2020 at 02:47 IST