पुणे : “शरद पवार यांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कमी होत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशासह राज्यातील मोठे नेते आहेत. राजकारणात त्यांची वेगळी छवी, ओळख आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सत्तासंघर्षावर लवकरात लवकर निर्णय होईल. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेळकाढूपणा करायचा होता. पण, न्यायालय असे करेल असे मला वाटत नाही. मेरिटवर आणि लोकशाहीवर आधारभूत असलेला निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे दरेकर म्हणाले.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

हेही वाचा – “गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली”; भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांचे विधान

दरेकर पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व अवलंबून नाही. देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य जनता आणि कर्तव्य त्यांचे मोठेपणा ठरवते. संजय राऊत यांच्याबद्दल बोलण्यात रस नाही. प्रसिद्धीसाठी ते काहीही वक्तव्ये करतात.

गिरीश बापट हे स्व:इच्छेने आले होते. निवडणूक असल्याने विरोधक या प्रकरणी टीकाच करणार, कौतुक नाही. भाजपाच्या दिवंगत मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी देखील मुंबईला जाऊन मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पाडले होते, असे दरेकर म्हणाले.

हेही वाचा – पुणे : कसब्याच्या निवडणुकीत आता शरद पवार यांचीही ‘एंट्री’; २२ फेब्रुवारीला प्रचारात सहभागी होऊन मेळावे घेणार

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यास नकार दिला. त्यांच्यावर बोलून मला त्यांचे महत्व वाढवायचे नाही, असे खोचक विधान शरद पवार यांनी केले होते. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.