यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १४७ वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला असून, पुढील तीन महिने असेच ‘तापदायक’ राहतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी वर्तवला. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्टय़ात उष्णतेच्या लाटा धडकतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा वाढता उकाडा असह्य ठरेलच; पण त्याचा परिणाम कृषी उत्पादनावरही होऊन महागाई ‘आयएमडी’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी मंगळवारी मार्च महिन्याबाबत हवामान अंदाजाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मार्चपासून मे महिन्यापर्यंतच्या काळात देशात सर्वत्रच सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता भान यांनी वर्तवली. १८७७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले होते, त्यानंतर फेब्रुवारी २०२३ हा सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. घटलेली चक्रीवादळांची संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस ही फेब्रुवारीतील उष्णतेची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

अंदाज काय?
ईशान्य भारतासह पूर्व आणि मध्य तसेच वायव्य भारतात मार्च ते मे या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमानाची शक्यता.
मार्च महिन्यात किमान तापमानही चढे राहण्याची शक्यता. दिवस-रात्रीतील तापमानात लक्षणीय तफावत राहण्याची चिन्हे.
मध्य भारतात उष्णतेची लाट येणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागाई वाढणार? सलग दुसऱ्या वर्षी धडकत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणाम गहू, तेलबिया, हरभरा यांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. मार्चमध्ये काढणीला आलेली पिके उष्णतेच्या माऱ्यामुळे होरपळण्याची चिन्हे आहेत. चलनवाढीचा दर नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना याची झळ बसून महागाई आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. या काळात विजेचा वापर वाढून वीजनिर्मितीवरही ताण येण्याची शक्यता आहे.