पुणे : लष्कर भागातील मद्याच्या दुकानात शिरलेल्या टोळक्याने तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आनंद झावरे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ, अद्याप ५० हजारांहून अधिक जागा रिक्त

हेही वाचा – Video: “एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या”, घरात पाणी शिरल्याने चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांना साद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील कल्पतरू सोसायटीत न्यूयाॅर्क वाईन शाॅप आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास तिघेजण हातात कोयते आणि तलवारी घेऊन मद्यविक्री दुकानात शिरले. टोळक्याने मद्य विक्री दुकानातील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड केली. मद्य विक्री दुकानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून आरोपी पसार झाले. आरोपींनी मद्य विक्री दुकानात तोडफोड का केली, याबाबतचे कारण समजू शकले नाही. मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.