पुणे : विनयभंगाची तक्रार देणाऱ्या तरुणीच्या आईला शिवीगाळ करून तक्रार मागे घेण्यासाठी ‌धमकावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन तरुणींसह चौघांविरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुजल (पूर्ण नाव पत्ता समजला नाही) तिच्या बरोबर असलेली एक तरुणी तसेच दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रेमसंबध तुटल्यानंतर भररस्त्यात तरुणीला अडवून तिला मारहाण तसेच गालाचा चावा घेतल्या प्रकरणी दानिश नायर या तरुणा विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नायर याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर तरुणीला धमकावण्यात आले होते. सुजल, तिच्या बरोबर असलेली एक तरुणी आणि दोघेजण तरुणीच्या घरी गेले. त्या वेळी आरोपींनी तरुणीच्या आईला शिवीगाळ करून नायरच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. पोलीस हवालदार करपे तपास करत आहेत.

हेही वाचा – ब्रेकअप झाल्याने प्रेयसीला मारहाण करत घेतला गालाचा चावा; पुण्यातील धक्कादायक घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


काय आहे प्रकरण?


नायर आणि तक्रारदार तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. चार दिवसांपूर्वी तरुणी उंड्री परिसरातून दुपारी जात होती. त्या वेळी नायरने तिला रस्त्यात अडवले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करून नायरने शिवीगाळ केली. तिच्या गालाचा चावा घेऊन तो पसार झाला होता.