‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ म्हणजेच इसिस या दहशतवादी संघटनेकडून पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख भानुप्रताप बर्गे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १० जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या एका पत्रात यासंबंधीचा उल्लेख आहे. या पत्रात इसिसने भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. सध्या हे पत्र पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून विशेष शाखेकडून या पत्राची तपासणी सुरू आहे आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुण्याच्या शिवाजी नगर भागात असणाऱ्या एटीएस कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तरूणांना इसिसमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी सध्या एटीएसकडून पुण्यात विविध ठिकाणी समुपदेशनाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर इसिसकडून धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2016 रोजी प्रकाशित
पुणे एटीएसच्या प्रमुखांना ‘इसिस’कडून जीवे मारण्याची धमकी
पुण्याच्या शिवाजी नगर भागात असणाऱ्या एटीएस कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-01-2016 at 09:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ats chief get threat from isis