शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरटे मोटारींचे सायलेन्सर चोरीकडे वळाले असल्याचे उघडकीस आले आहे. शहर आणि जिल्ह्यात मोटारींचे सायलेन्सर चोरणाऱ्या चोरट्यांना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सायलेन्सर चोरीचे १४ गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख ६० हजारांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.

शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (वय २१), राम राजेश ढोले (वय २०, दोघे रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रोकडे, ढोले यांनी शहर आणि जिल्ह्यात मोटारीचे सायलेन्सर चोरीचे गुन्हे केले होते. लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना नुकतेच पकडले. त्याच्याकडून सायलेन्सर चोरीचे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. दोघांनी विमानतळ, येरवडा, सासवड, हडपसर, कोंढवा भागात सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेतील निरीक्षक सुभाष काळे, सहायक निरीक्षक राजू महानोर, नितीन गायकवाड, संतोष होले, सुनील नागले, अमित साळुंखे आदींनी ही कारवाई केली.

सायलेन्सरमधील धातूचा चुरा विक्रीस –

एका विशिष्ट कंपनीच्या मोटारीतील सायलेन्सरमधील कॅथलिक कर्नव्हटरमध्ये असलेला धातूमिश्रीत‌ भागाचा चुरा करुन आरोपी शिवप्रसाद रोकडे आणि राम ढोले त्याची विक्री शहाबाज खानला करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चुऱ्याला चांगली किंमत मिळत असल्याचे आरोपींनी पोलिसांनी सांगितले असून चुरा विकत घेणाऱ्या खानचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.