Pune Couple Viral Video पुण्यात एका प्रेमी युगलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.हा पुण्यातील एका प्रेमीयुगुलाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत बाईकवर बसून तरुण तरुणी चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील असल्याचं बोललं जातं आहे. एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलट बाजूने बसली आहे आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार ही दुचाकी चालवतोय. आजू-बाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये काढताना त्यांना दिसत आहेत, पण कुणाचीच फिकिर न करता हे जोडपं त्यांच्या प्रेमात अखंड बुडाल्याचं दिसतं आहे. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हिडीओत नेमकं काय दिसतं आहे?
वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीवर एक तरुण-तरुणी चाळे करतानाचा या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी आता नेटकरी करु लागले आहेत. दरम्यान या तरूणीने आपलं तोंड स्कार्फने बांधलेलं आहे, तर व्हिडीओमध्ये ते दोघे एकमेकांना मिठी मारताना देखील ते दिसतात, जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पाहात आहेत. मात्र या दोघांना कशाचीच पर्वा उरलेली दिसत नाही. पुण्यातला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
पाहा व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी मुंबईतही तरुण-तरुणीचा धिंगाणा
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मालाड लिंक रोडवर मध्यरात्री एका कारमध्ये तरुण आणि तरुणीने असाच धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तरुण आणि तरुणीने कारच्या सन रुफमधून बाहेर येत मालाड लिंक रोड मीठ चौकीजवळ रस्त्यावर धिंगाणा घातला. भरधाव वेगामध्ये कार चालवून स्वतःचा जीव आणि इतरांच्या जीव धोक्यात घालून तरुणांचा धिंगाणा सुरु होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कांदिवली वाहतूक पोलिसांच्या फिर्यादीवरून या तरुणांच्या विरोधात बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव काय म्हणाले?
एका दुचाकीवर एक तरुणी पेट्रोलच्या टाकीवर उलट बसून दुचाकी चालकासोबत बोलत प्रवास करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही संबंधित दुचाकी चालकाचा शोध घेऊन वाहतूक कायद्यानुसार कारवाई करणार आहोत,तसेच वाहतूक नियमांचे कोणी ही उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असं पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले.