सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणाऱ्या व्यक्तींवर किती विश्वास ठेवावा आणि त्यांच्याशी मैत्री करताना किती सावध असायला हवं, याची प्रचिती देणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना घडत आहेत. पुण्यातील एका तरुणाची फेसबुकवरून एका तरुणीसोबत ओळख झाली. याच ओळखीचा फायदा उठवत त्या तरुणीने पुण्यातील तरुणाचा नग्न अवस्थेमधील व्हिडिओ तयार केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार रूपयांची मागणी केली. त्यावर आपल्याकडे फक्त ९५७ रुपयेच असल्याचे पीडित तरुणाने सांगितलं. ते ९५७ रुपयेही ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीने घेऊन टाकले. या प्रकरणी आता सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर विभागाने या प्रकरणाची माहिती दिली आहे. दोघांची फेसबुक या सोशल माध्यमावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये चांगलीच मैत्रीही झाली. दोघांनी एकमेकांना नंबर देखील शेयर केले. या दोघांमध्ये व्हाट्सअपवरून सतत बोलणे होत होते. याच दरम्यान २९ वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेमधील व्हिडिओ आरोपीने रेकॉर्ड केला.

म्हणाला पैशांचा पाऊस पडतो! व्यायसायिकाला ५२ लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

त्यानंतर ‘मला १० हजार रुपये दे, अन्यथा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करेल,’ अशी धमकी तिने दिली. त्यावर पीडित तरुण म्हणाला की, ‘माझ्याकडे पैसे नाही. इतके पैसे मी देऊ शकत नाही.’ ब्लॅकमेल करणारी तरूणी त्याचा पिच्छा सोडत नव्हती. सततच्या होणार्‍या पैशांच्या मागणीला वैतागून त्याने, ‘माझ्याकडे ९५७ रुपये आहे.’ इतकेच पैसे असल्याचं सांगत त्याने ते गुगल पे वरुन देऊन टाकले.

पुणे : करोनातून झाला बरा, पण पत्नीनेच गळा दाबून घेतला जीव; पोलिसांमुळे समोर आलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, प्रकरण थांबलं नाही. त्यानंतर देखील ब्लॅकमेल करणारी तरूणी सतत पैशांची मागणी करायची. धमकी देणंही सुरूच होतं. त्यामुळे पीडित तरुणाने सायबर विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्या फिर्यादी तरुणांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास करण्यात येत असल्याची माहिती सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक एस. माळी यांनी दिली.